महाड : महाड वन विभागाने गुजराकडून गोव्याच्या दिशेने जाणार्या विना परवाना एका ट्रकवर महाड तालुक्यातील राजेवाडी फाट्याजवळ कारवाई करून ट्रकसह पाच लाखांचा खैरसाठा जप्त केला. या प्रकरणी ट्रकचालक मालक याला ताब्यात घेतले असून ट्रक आणि त्यातील खैराची लाकडे जप्त केली आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर राजेवाडी फाट्याजवळ महाड वनविभागाने रविवारी (दि. 6) रात्री महाड वनविभागाने मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचला आणि रात्री 11 वाजण्याच्या सुमारास डीएन 09- एन 9345 हा गुजरात सिल्वासा ते चिपळूण सावर्डेकडे जाणारा ट्रक अडवला. त्याची तपासणी केली असता याद्वारे विनापरवाना खैराच्या लाकडाची वाहतूक होत असल्याचे उघड झाले. पथकाने ट्रकचालक व मालक शांताराम खंडू पाटील (रा. सिल्वासा, गुजरात) याला ताब्यात घेतले. हा माल सावर्डे येथे सचिन कात मिलकडे पोहचवायचा होता. पथकाने या ट्रकमध्ये असलेले लाखो 395 खैराचे नग व ट्रक असा मिळून पाच लाख किमतीचा माल ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी आरोपी शांताराम पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …