Breaking News

दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत रायगड संघ अव्वल

धाटाव ः प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे झालेल्या लेदर बॉल दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत स्थानिक रत्नागिरी संघावर मात करीत रायगड संघाने अव्वलस्थान पटकावले. या स्पर्धेत रायगड, रत्नागिरी अ आणि ब, कोल्हापूर, अहमदनगर व सोलापूर अशा एकूण सहा संघांनी सहभाग घेतला होता. रायगड जिल्ह्याचा दिव्यांग क्रिकेट संघ हा साईनाथ पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रशिक्षक मंगेश दळवी, व्यवस्थापक विजय लाड व राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेत सहभागी झाला होता. अंतिम सामन्यात बलाढ्य रत्नागिरी संघाविरुद्ध रायगड संघाने प्रथम फलंदाजी करीत निर्धारित सहा षटकांत 50 धावांचे आव्हान ठेवले होते. यामध्ये शैलेश पाटील, सहदेव बर्डे, कल्पेश ठाकूर, हितेश पाटील व ऋषिकेश  पाटील यांनी फलंदाजीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. यानंतर रायगडने भेदक गोलंदाजी करीत रत्नागिरीला 32 धावांवर रोखून 18 धावांनी विजय मिळविला. शैलेश पाटीलने मालिकवीराचा बहुमान पटकविला. विजयी संघात मंगेश जाधव (कर्णधार, नागोठणे), शैलेश पाटील (उपकर्णधार, अलिबाग), सहदेव बर्डे (रोहा), हितेश पाटील (अलिबाग), कल्पेश ठाकूर (नागोठणे), ऋषिकेश येशपाटिल (रोहा), संदीप दगडू ठाकूर (पांडापूर, पेण), संदीप ठाकूर (आमटेम, पेण), विलास कदम (आपटा, पनवेल), मुकेश पिंगळे (तळा), नितीन महाबळे (रोहा), शकिल उकये (म्हसळा) यांचा सहभाग होता.

Check Also

आरोग्य योजनांतर्गत करण्यात येणार्‍या उपचारांचे दरपत्रक जाहीर करा

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची तारांकित प्रश्नाद्वारे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यात आयुष्मान …

Leave a Reply