Breaking News

पिंच्याक सिल्याट स्पर्धेत अनुज सरनाईकला ‘सुवर्ण’

पाली ः प्रतिनिधी

दिव-दमण येथे नुकत्याच झालेल्या तिसर्‍या वेस्ट झोन पिंच्याक सिल्याट चॅम्पियनशिप स्पर्धेत पालीतील अनुज सरनाईक यांनी 85 ते 90 वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले. अंतिम सामन्यात राजस्थानच्या खेळाडूला हरवून अनुज सरनाईकने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. या यशामुळे खूप आनंद होत आहे, असे अनुजने सांगितले. अनुजला भारतीय पिंच्याक सिल्याट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर प्रकाश येवले यांचे मार्गदर्शन लाभले. यशामुळे अनुजचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply