खोपोली : प्रतिनिधी
खोपोली नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11मध्ये भाजप, शिवसेना व रिपाई महायुतीची संयुक्तरित्या प्रचार रॅली काढण्यात आली. उमेदवार विक्रम साबळे व सानिया शेख यांच्याबरोबर रायगड निवडणूक प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर, सरचिटणीस प्रकाश बिनेदार, प्रभारी सुनील घरत, खोपोली निवडणूक प्रमुख यशवंत साबळे, शहराध्यक्ष अजय इंगुलकर, शिवसेनेचे मोहसिन शेख यांच्यासह युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांतीनगर येथील दत्त मंदिरात विक्रम साबळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले, त्यानंतर प्रचारास प्रारंभ झाला. गुरुवारी सायंकाळपर्यंत शांतीनगर विभाग पूर्ण करण्यात आला.
दरम्यान, उरण नगर परिषद निवडणूकीसाठी उरण शहरात भाजप महायुतीच्या प्रचार रॅलीला सुरुवात झाली असून बुधवारी प्रभाग क्र.10चे अधिकृत उमेदवार राजेश ठाकूर व दमयंती म्हात्रे, सायली म्हात्रे तसेच नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार शोभा कोळी-शाह यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी कामठा येथे प्रचार रॅली काढली होती. या वेळी भाजप उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह, निता महेश बालदी, भाजप उरण तालुका ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनेश गावंड, सरचिटणीस सुनील पाटील, शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, रवी कुलकर्णी, मनोहर सहतिया, जितेंद्र घरत, राजेश गावडे, शहर मंडळ अध्यक्ष प्रसाद भोईर, कैलास भोईर, स्नेहल कासारे, प्रेम मढवी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Check Also
भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …
RamPrahar – The Panvel Daily Paper