उरण ः बातमीदार
आमदार महेश बालदी यांच्या जिल्हा नियोजन निधीतून आवरे येथील तलाव सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन भाजप उरण तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर व आवरे सरपंच निराबाई पाटील यांच्या हस्ते झाले.
या वेळी महिला तालुकाध्यक्ष राणी म्हात्रे, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, पूर्व विभाग प्रमुख शशिकांत पाटील, संतोष वर्तक-गोवठणे, खोपटे ग्रामपंचायत सदस्य अच्युत ठाकूर, संदेश भाई पुनाडे, मच्छिंद्र वर्तक-गोवठणे, प्रा. प्रमोद म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य चेतन पाटील, ग्रामपंचायत सदस्य स्वाती गावंड, गावअध्यक्ष बाळा गावंड, आवरे ग्रामपंचायत सदस्य अनिल गावंड, पाले गावअध्यक्ष अमित म्हात्रे, सुनिल पाटील-बोकडविरा, निर्णय पाटील-गोवठणे तसेच विभागातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.