Breaking News

भाजप नेते एकनाथ देशेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासींना धान्यवाटप

आज विविध कार्यक्रमाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाचे ओबीसी संघटनेचे अध्यक्ष एकनाथ देशेकर यांच्या वाढदिवसानिमित्त करंबेली आदिवासीवाडी येथे शनिवारी (दि. 19) धान्याचे वाटप करण्यात आले. येथील नागरिकांनी देशेकर यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. दरम्यान, रविवारी (दि. 20) होणार्‍या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यासोबतच रविवारी शांतीवन येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त 14 ते 20 मार्चदरम्यान ई-श्रम कार्ड महानोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे.

या भागात कंपनी विभाग असून येथे 90 टक्के कामगार कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करत असून असंघटित आहेत. त्या कामगारांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा म्हणून एकनाथ देशेकर यांनी सात दिवस ई-श्रम कार्ड महाअभियानाचे आयोजन केले आहे. असंघटित कामगारानो या आणि ई-श्रम कार्डचा नोंदणी मोफत करून घ्या. आणि सरकारतर्फे मिळणार्‍या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा असे आवाहन एकनाथ देशेकर यांनी केले आहे. या कार्डच्या माध्यमातून गरीब जनतेला याचा फायदा घेता येणार आहे अनेक व्यवसायासाठी शासनाकडून आर्थिक मदत होणार आहे. एकनाथ देशेकर यांच्या वाढदिवसानिमित्त चिंध्रण गावातील काँक्रिट रस्त्याचे व अन्य विकामकामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Check Also

भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …

Leave a Reply