Breaking News

मायनॉरिटी उर्दू कन्याशाळेत निरोप समारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त

पीपल्स अ‍ॅन्ड पेरेन्टस् असोसिएशन पनवेल या संस्थेचा मायनॉरिटी उर्दु कन्या शाळेचा इयत्ता दहावीचा निरोप समारंभ नुकताच झाला. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष वाहिद हुसेन शेख साहेब व उपाध्यक्ष जुबेर पिटटू तसेच सेक्रेटरी अजीम शब्बीर मुल्ला उर्दु कमिटीचे चेअरमन अब्दुल हमीद धुरू असलम पठाण, वहाब दाखवे, डॉ. आमीना कच्छी आदी उपस्थित होते. तसेच विशेष अतिथी म्हणून हनिफ कच्छी, अब्दुलहाई शेख हे उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी दहावीच्या विद्यार्थिनींना एस.एस.सी. बोर्ड परीक्षा व जीवनाच्या पुढील वाटचालीसाठी योग्य मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये मायनॉरिटी उर्दु कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका कुदसिया प्रायमसवाला यांच्या भरीव व निस्वार्थी कार्याबद्दल दखल घेऊन हलिमाबाई झुलेवाली ट्रस्टतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका शहजीन पटेल, नसीरा इंडी मॅडम, कौछाली उझमा व दिपाली मॅडम आदींनी परिश्रम घेतले.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply