Breaking News

माणगाव कुणबी समाज मंडळातर्फे संत तुकाराम बीज

माणगाव ः प्रतिनिधी

सालाबादप्रमाणे माणगाव तालुका कुणबी समाज विकास मंडळातर्फे हभप जयराम खाडे महाराज यांच्या नेतृत्वाखाली जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज बीज व सत्कार सोहळा रविवारी (दि. 20) तालुका कुणबी विकास मंडळाचे अध्यक्ष महादेवराव बक्कम यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा झाला.

या दिवशी सकाळी हभप गुगले महाराज निळगुण यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन, कुणबी भवन परिसरात पालखी सोहळा, हभप पुंडलिक देसाई महाराज यांचे किर्तन, दुपारी महाप्रसाद तसेच कुणबी समाजातील लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेवराव बक्कम यांनी सांगितले, समाजातील माणगाव नगरपंचायतीवर विराजमान झालेले नगराध्यक्ष व सर्व नगरसेविकांचे समाजाच्यावतीने मनापासून अभिनंदन करतो. या संधीचे आपण सोने कराल अशी मला खात्री आहे. नगराध्यक्षांनी समाज बांधवांचे काम प्राधान्याने करावे अशा सूचना केल्या. बीज सोहळ्याचे संस्थापक तथा कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते रामभाऊ टेंबे यांनी सांगितले, सन 2016 साली तालुका कुणबी समाज विकास मंडळाच्या वतीने आपण माणगावात तुकाराम महाराज बीज सोहळा सुरू केला त्याचे हे सातवे वर्ष आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते महादेवराव बक्कम, रामभाऊ टेंबे, काका नवगणे, महीपत वाढवळ, टिकम भोनकर, वाढवळ गुरुजी, जयराम खाडे महाराज, मुरकर महाराज, सहादेव बक्कम, माजी सभापती संगिता बक्कम, सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला सत्वे, माणगाव पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, संदिप खरंगटे, माजी स्विकृत नगरसेवक नितीन बामगुडे, सामाजिक कार्यकर्ते नथुराम पाष्टे, समाधान उतेकर, नितीन खडतर, कृष्ण पानावकर, रवींद्र अर्बन, नथुराम मोरे आदींसह साधुसंत व कुणबी समाज बांधव उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply