‘दै. राम प्रहार‘ चे समाधान पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार प्रदान
नागोठणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघाचे नागोठणे शाखेतर्फे सोमवारी (दि. 21) विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणार्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रमुख राज वैशंपायन यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू विषद केला. या वेळी ‘एबीपी माझा‘ च्या वृषाली यादव (तानुबाई बिर्जे सर्वोत्कृष्ठ निवेदिका पुरस्कार), ‘ न्यूज 18 लोकमत‘ च्या स्वाती लोखंडे (सावित्रीबाई फुले सर्वोत्कृष्ट महिला पत्रकार), ‘दै. राम प्रहार‘ चे समाधान पाटील (डॉ. बाबसाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार), ‘मुंबई सकाळ‘ चे विनोद राऊत (आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट स्तंभलेखक पुरस्कार), ‘मुंबई सकाळ‘ मिलिंद तांबे (महात्मा फुले सर्वोत्कृष्ट सामाजिक पत्रकार), ‘रायगड टाइम्स‘ दिलीप आढाव (आचार्य बाळशास्त्री जांभेकर सर्वोत्कृष्ट उपसंपादक), तसेच प्रसिध्द गायक जगदीश पाटील (स्वर भूषण), सोनाली भोईर (स्वर सरिता), संतोष चौधरी (स्वर सागर), हर्षला पाटील (स्वर साधना), आणि अभिलाषा म्हात्रे (पी. टी. उषा सर्वोत्कृष्ट खेळाडू) यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
राजिपचे माजी सदस्य किशोर जैन, माजी पं.स. सदस्य संजय भोसले, नागोठणे उपसरपंच मोहन नागोठणेकर, दर्शना जवके, अॅड. तमन्ना शेख, अॅड. स्वप्निल दिघे, अॅड. दीपक सोलंकी, हर्षाला म्हात्रे, जुईली म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, हास्यसम्राट जॉनी रावत आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघाचे नागोठणे शाखा अध्यक्ष याकूब सय्यद, सचिव संदेश गायकर, खजिनदार प्रवीण बडे, मंजुळा म्हात्रे यांच्यासह सर्व सदस्यांनी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.