Breaking News

नवी मुंबईत भाजपचाच महापौर होणार; भाजपच्या रामचंद्र घरत यांचा विश्वास

नवी मुंबई : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा पक्ष आहे. सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानत विकासाचा अजेंडा राबवणारा पक्ष असल्याने आज जगात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. नवी मुंबईतही आम्ही जोमाने काम करीत आहोत. भाजपा कार्यकर्ते नागरिकांच्या प्रत्येक अडीअडचणीला धावून जात असून आगामी महापालिका निवडणुकीत  इस बार 80 पार करणार असून भाजपचाच महापौर नवी मुंबई मनपात असणार आहे, असा विश्वास नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. रामचंद्र घरत यांनी नेरूळमध्ये बोलताना व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस नवी मुंबई भाजपच्या वतीने नेरूळमधील भाजप कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना रामचंद्र  घरत बोलत होते.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील अभ्यासू नेतृत्व देवेन्द्र फडणवीस ही आमची बलस्थाने आहेत, सबका साथ, सबका विकास हा ध्यास घेऊन आपला देश प्रगतीकडे वाटचाल करित असल्याचे त्यानी सांगितले. या वेळी उत्तर भारतीय मोर्चा नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष राजेश राय, महाराष्ट्र प्रदेश आय टी संयोजक सतीश निकम यांनी भाजपच्या विविध राज्यातील निवडणुकीतील नेत्रदीपक विजयाची प्रशंसा करित याचे श्रेय भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांना दिले. या वेळी भाजप नवी मुंबई महामंत्री कृष्णा पाटील, विजय घाटे यांच्यासह नवी मुंबईतील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply