Breaking News

नवीन पनवेलमध्ये पुलाचे उद्घाटन

विद्यार्थ्यांसह नागरिकांना सुविधा

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा विद्यमान नगरसेवक संतोष शेट्टी प्रयत्नांमुळे नवीन पनवेल येथील डीएव्ही शाळेजवळ पूल उभारण्यात आला आहे. या पुलाचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 11) झाले. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी विकासासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहा, असे प्रतिपादन केले.
भाजपच्या सत्ताधारी नगरसेवकांमार्फत नागरिकांना भेडसावणार्‍या समस्या सोडविण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार नवीन पनवेल येथील डीएव्ही शाळेजवळ असलेल्या नाल्यामुळे या ठिकाणाहून जाणार्‍या नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत होता. पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा विद्यमान नगरसेवक संतोष शेट्टी यांच्या प्रयत्नांमुळे या नाल्यावर पूल उभारण्यात आला आहे. या पुलाचे उद्घाटन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या वेळी नगरसेवक राजू सोनी, समीर ठाकूर, नगरसेविका राजश्री वावेकर, डीएव्ही स्कूलच्या मुख्याध्यापिका चैतन्या रेड्डी, शिवाजी भगत, जितेंद्र तिवारी, अक्षय सिंग, शोभा सातपुते, कुलबीर चंडोक, आशा शेट्टी, विठाबाई सावंत, आर.पी. पाटील, देवेंद्र परब, श्याम शहा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Check Also

नतनोत्सवाने पनवेलमध्ये रंगला कलेचा सुरेल जल्लोष

नगरसेवक परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तसांस्कृतिक कलेचा वारसा जपणाऱ्या नृत्यार्पण फाईन …

Leave a Reply