पनवेल ः प्रतिनिधी
सर्व खासगी कोविड लसीकरण केंद्रांमध्ये 18 ते 59 वर्षांवरील नागरिकांचे दुसरा डोस घेऊन 9 महिने झालेल्यांना प्रिकॉशनरी डोस 10 एप्रिलपासून उपलब्ध करून देण्यात आला आहे.
18 ते 59 या वयोगटातील नागरिकांचे प्रिकॉशन डोसचे लसीकरण हे केवळ खासगी कोविड लसीकरण केंद्रांमध्ये उपलब्ध असेल. या लसीकरणाकरीता कुठलेही नवीन रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. 18 ते 59 वय नागरिकांचे प्रिकॉशन डोसच्या लाभार्थ्यांनी दुसर्या डोसचे सर्टिफिकेट, दुसरा डोस घेताना वापरलेला आयडी प्रुफ व दुसर्या डोसकरीता दिलेला मोबईल नंबर लसीकरण केंद्रावर सोबत घेऊन जावा. खासगी कोविड केंद्रांमधील लसीकरण सशुल्क असणार आहे. या लसीकरणाकरी शुल्क रु. 225, जीएसटी, रु. 150 पर्यंत सर्विस शुल्क शासनाने ठरविले आहे.
नागरिकांना पहिले दोन डोस ज्या लसीचे घेतले आहेत तीच लस प्रिकॉशन डोससाठी घ्यावी लागणार आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील एकूण 81 रूग्णांलयांना कोविड लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. शासकीय कोविड लसीकरण केंद्रांमध्ये 60 वर्षावरील नागरीकांना, तसेच पहिल्या फळीतील आणि आरोग्य कर्मचारी यांना प्रिकॉशनरी डोस पूर्वीप्रमाणे लसीकरण केंद्रावर उपलब्ध होणार आहे.