Breaking News

कसळखंडमधील रस्ते होणार चकाचक!

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील कसळखंड ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी अनिल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कसळखंड ग्रामपंचायत हद्दीत भाजपचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक आमदार निधी अंतर्गत विविध रस्त्यांच्या कामांसाठी भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 18) करण्यात आले. गावातील रस्ते चकाचक होणार असल्याने ग्रामस्थांनी भारतीय जनता पक्षाचे आभार मानले आहेत.

कसळखंड ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांची दूरवस्था झाली होती. त्यामुळे नागरिकांची विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे या रस्त्यांचे काँक्रिटीकरण व्हावे यासाठी कसळखंडच्या सरपंच माधुरी अनिल पाटील यांनी सातत्याने आमदार महेश बालदी यांच्याकडे पाठपुरावा केला. आमदार महेश बालदी यांनीदेखील तातडीने रस्त्यांच्या कामांसाठी त्यांच्या आमदार निधीतून 25 लाखांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये शिवाजीनगर गाव ते कसळखंड गावापर्यंत मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण 10 लाख, शिवाजीनगर गावातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण पाच लाख व कसळखंड गाव ते शिवाजीनगर मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण 10 लाख असा निधी देण्यात आला आहे. या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन सोमवारी तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी सरपंच माधुरी पाटील, उपसरपंच महेंद्र गोजे, कसळखंड ग्रा. पं. सदस्या मोनिका पाटील, भाताण ग्रा. पं. सदस्य तानाजी पाटील, माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, युवानेते गणेश गाडे, रवींद्र घरत, प्रभारी पोलीस निरीक्षक पी. झेड. गाडे, कविता मते, डॉ. अविनाश गाताडे, प्रवीण ठाकूर, माई गायकर, मनीषा पाटील, सचिन पाटील, रामदास घरत, शांताराम पाटील, भालचंद्र पाटील, महेश घरत, तंटामुक्ती अध्यक्ष वसंत पाटील, रमेश पाटील, संतोष घरत, दिनेश नाईक, जय मते, रोहिदास जूनघरे, रोशन सकपाळ, किरण पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply