Breaking News

कोकण विभागात 4,910पेक्षा अधिक एसटी कर्मचारी रूजू

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त

कोकण विभगातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या चार जिल्ह्यांतील आगारांत मिळून चार हजार 910पेक्षा अधिक एसटी कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत, तर 50 टक्क्यांहून अधिक एसटी वाहतूक सुरू झाली असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. 28 ऑक्टोबर 2021पासून राज्यातील जवळपास 92 हजार एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारला होता. संपामुळे राज्यातील एसटी सेवा ठप्प झाली होती. 8 ते 18 एप्रिल या कालावधीत कोकण विभागाच्या ठाणे जिल्ह्यातील आगारांत एक हजार 425, रायगड जिल्ह्यातील आगारांत एक हजार 644, रत्नागिरी जिल्ह्यातील आगारांत एक हजार 125 आणि पालघर जिल्ह्यातील आगारांत 716 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. कोकणात लवकरच 100 टक्के एसटी वाहतूक सुरु होईल, असे आगार प्रमुखांकडून सांगण्यात आले आहे.

Check Also

राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पनवेल महापालिकेला प्रशस्तीपत्र प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या …

Leave a Reply