Breaking News

नवी मुंबईतील 475 इमारती धोकादायक घोषित; ताबा सोडण्याचे रहिवाशांना आवाहन

नवी मुंबई ः बातमीदार

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन 2021-22 या वर्षासाठी सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणानंतर महानगरपालिका क्षेत्रात एकूण 475 इमारती धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. ज्या इमारतींचा वापर सुरू होऊन 30 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे, अशा इमारतींची नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्याकडून किंवा संरचना अभियंत्याकडून संरचना परिक्षण करून घेणे अनिवार्य आहे. 30 वर्षांपेक्षा जास्त काळ इमारतीचा वापर किंवा इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र (पूर्ण अथवा अंशत:) क्षेत्रफळ वापराखाली आणले गेले अशा दिवसापासून मोजवयाचा आहे. नेमलेल्या संरचना अभियंत्याने शिफारशी केलेली दुरूस्तीची कामे पूर्ण झाल्याचे व ते बांधकाम सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र नवी मुंबई महानगरपालिकेकडे सादर करावे. या प्रकारे संरचना परिक्षण करण्याचे उत्तरदायित्व जी संस्था, मालक, भोगवटादार पार पाडण्यास टाळाटाळ करतील त्यांना 25 हजार रूपये अथवा त्या मिळकतीचे वार्षिक मालमत्ताकराची रक्कम यातील जी जास्त असेल तितक्या रक्कमेचा दंड ठोठवावयाची तरतूद करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने संरचनात्मक परिक्षक (स्ट्रक्चरल इंजिनियर) यांची यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे. 30 वर्षांपेक्षा जास्त काळ झालेल्या इमारतीचे संरचनात्मक परिक्षण 30 सप्टेंबर 2022 पूर्वी पूर्ण करून याबाबतचा अहवाल संबधित विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि सहाय्यक संचालक नगररचना, नवी मुंबई महानगरपालिका यांचेकडे सादर करायचा आहे. धोकादायक झालेल्या इमारतींचा, घरांचा वापर करणे जीकिरीचे आहे. त्यामुळे जीवित व वित्तहानी होऊ शकते, म्हणून नागरिकांकडून धोकादायक इमारतींचा, घराचा वापर तत्काळ थांबविण्यात यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Check Also

मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात कला मंच आणि एआय केंद्राचे उद्घाटन

मोखाडा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply