Breaking News

पनवेल मनपाने ग्रामीण भागातील कर भरणा सवलत वाढवावी

भाजपच्या राजेश गायकर यांची आयुक्तांकडे मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेतर्फे ग्रामीण भागात बिले आता वितरीत होत आहेत. त्यामुळे जी सवलत वा अवधी शहरात यापूर्वी आपण दिला होता तीच सवलत ग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिली जावी, अशा मागणीचे निवेदन शुक्रवारी (दि. 22) ओबीसी मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत आयुक्त गणेश देशमुख यांना दिले.
पनवेल महापालिकेच्या वतीने या महिन्यात गावागावातील मालमत्ता कराच्या बिलांचे वाटप करण्यात आले आहे. या बिलांवर 30 एप्रिलपर्यंत म्हणजेच एक महिन्यात मालमत्ता कर भरणार्‍यांना 10% सवलत दिलेली आहे, तसेच 30 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच तीन महिन्यांत मालमत्ता कर भरणार्‍या ग्रामस्थांना 5% सवलत दिलेली आहे. दुसरीकडे यापूर्वी वसाहतींमधील मालमत्ता कर भरण्यासाठी एक महिन्यात भरल्यास 15% सवलत, तीन महिन्यांत भरल्यास 10%, तर नऊ महिन्यांत म्हणजेच 31 मार्चपर्यंत भरल्यास 5% कर सवलत दिलेली होती. ते पाहता ग्रामीण भागासाठी दुजाभाव होऊ नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आयुक्तांना निवेदन देतेवेळी उपमहापौर सीताताई पाटील, ज्येष्ठ नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, नगरसेविका रूचिता लोंढे उपस्थित होते.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply