Breaking News

ऑनलाइन व्यवहारात सावधानता गरजेची -विपिनकुमार पांडे

पेण येथील ग्राहक मेळाव्यातून एसबीआयची जनजागृती

पेण : प्रतिनिधी

ग्राहकांनी ऑनलाइन खरेदी व्यवहार करताना सावध रहावे, असे आवाहन स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक विपिनकुमार पांडे यांनी पेण येथे केले.

आझादी महोत्सवानिमित्त स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) तर्फे पेण येथे ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विपिनकुमार पांडे उपस्थितांना मार्गदर्शनकरीत होते. सध्या ऑनलाइन व्यवहार मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. मात्र त्यामुळे सायबर क्राईम वाढत असल्याचे पांडे यांनी या वेळी सांगितले.

बोगस फोन, मेसेज, मेल अपडेटसचे मेसेज येतात, ते डाऊनलोड करु नका. वैयक्तिक माहिती देऊ नका. युनो अँप, क्युआर कोड पाठवला जातो, त्याबाबतीत सावध रहा. काही वेळा पैशाची मागणी केली जाते, स्वीकारु नका. मॉल व इतर ठिकाणी मोबाईल चार्जिंग करु नका. लाटरी लागली, फी भरा असे सांगून फसवणूक केली जाते त्याबाबत सतर्क रहा, अशा सूचना विपिनकुमार पांडे यांनी या वेळी केल्या.

नोकरीला लावतो सांगून क्रेडिट कार्डने पैसे भरा सांगितले जाते, त्यापासून सावध रहा. पैशाची देवाण घेवाण करताना काळजी घ्या. आपल्या एटीएमचा पिन लिहू नका, सांगू नका, गोपनीय ठेवा. अधिक माहितीसाठी बँकेच्या टोल क्रमांक 18001234 या नंबरवर संपर्क साधा, असे आवाहन एसबीआयचे प्रादेशीक व्यवस्थापक कुमार परिमल प्रेम यांनी या वेळी केले.

या मेळाव्यात ग्राहक व व्यापार्‍यांनी आपल्या समस्या मांडल्या. त्यावर चर्चा करण्यात आली. एसबीआयचे  पेण शाखा व्यवस्थापक प्रविणकुमार सिंग यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक आणि ग्राहक या वेळी उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply