Breaking News

भंगार गोळा करणार्यांकडून घडले माणुसकीचे दर्शन

उरण : बातमीदार

उरण तालुक्यात भंगार व कचरा गोळा करणार्‍या दोघांनी माणुसकीचे दर्शन घडविल्याची घटना उरणमध्ये घडली आहे.

सविस्तर घटना अशी की, 7 मे रोजी मासेमारी व्यवसाय असणार्‍या करंजा कासवले पाडा येथील रहिवासी 33 वर्षीय सुशाली धनंजय नाखवा यांची 10 वर्षीय मुलगी विधी धनंजय नाखवा हीची प्रकृती बिघडली. तिच्यावर औषधोपचार करण्यासाठी त्यांची अँक्टीव्हा मोटरसायकल घेऊन ते करंजा कासवले पाडा ते नाखवा हॉस्पीटल, कोटनाका येथे जात असताना त्यांच्याजवळ असलेल्या पर्समध्ये 10 हजार रुपये रोख रक्कम, विवो कंपनीचा मोबाईल फोन व मुलीच्या औषधोपचारा करीता पैसे कमी पडत असल्याने सोनाराकडे गहाण ठेवण्याकरीता सोबत ठेवलेले साडेतीन तोळे सोन्याचे मंगळसुत्र असे आनंदी हॉटेल जवळ आले असता रस्त्यात पडुन गहाळ झाले.

ही पर्स परत मिळावी या करिता तक्रार देण्यासाठी त्या उरण पोलीस ठाणे येथे आल्या. त्यावेळी उरण पोलीस ठाणे येथे रस्त्यावर भंगार व कचरा गोळा करणारे अश्रफ असगर शेख (वय 18) व अमित लालजी चौधरी (वय 23, दोन्ही रा.बोरी पाखाडी) हे उरण पोलीस ठाण्यात आले व त्यांनी आंनदी हॉटेलजवळील पेट्रोल पंपसमोरील रस्त्यावर सापडलेली पर्स मुळ मालकाला परत मिळावी या करिता पोलीस ठाण्यात जमा केली.

जमा केलेली पर्स सुशाली नाखवा यांना दाखवुन व खात्री करून या प्रकरणी पोलीस ठाण्यात आलेल्या अश्रफ असगर शेख व अमित लालजी चौधरी यांना सुशाली नाखवा यांच्या समोर हजर केले. या दोघांनी प्रमाणिकपणे पर्स सुशाली धनंजय नाखवा यांना परत करून उत्कृष्ट व उल्लेखनिय कामगिरी करत माणुसकीचे दर्शन घडविले. त्याबद्दल उरण पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या टीम ने अश्रफ असगर शेख, अमित लालजी चौधरी यांचा रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व कौतुक केले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply