Breaking News

ऐरोलीत विविध विकासकामांचा शुभारंभ

आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

नवी मुंबई : बातमीदार

आमदार गणेश नाईक यांच्या स्थानिक आमदार विकास  निधीतून विविध नागरी कामांचे भूमिपूजन रविवारी (दि. 22) ऐरोलीत झाले. या वेळी मुंबई आणि ठाण्याला मालमत्ता कर सवलत मंजूर करणार्‍या राज्य सरकारने नवी मुंबईचा प्रस्ताव अद्याप मंजूर केलेला नाही. सरकारकडून नवी मुंबईला सापत्नपणाची वागणूक दिली जात आहे. नवी मुंबईत नागरिक राहत नाहीत काय? असा सवाल आमदार नाईक यांनी करताना नवी मुंबईला करमाफी आणि कर सवलत मिळवून देणारच असा निर्धार व्यक्त केला.

या वेळी माजी आमदार संदीप नाईक, स्थायी समितीचे माजी सभापती अनंत सुतार, सामाजिक कार्यकर्ते राजेश मढवी, अ‍ॅड. संध्या सावंत, निकेतन पाटील, कैलास सुकाळे, दीपक पाटील, अरुण पडते, पूनम सुकाळे, प्रकाश मंत्री यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी, भाजपचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

65 लाख निधीची विकासकामे ऐरोली दिवा कोळीवाडा चौकात सुशोभीकरण, प्रभाग क्रमांक 12 ऐरोली सेक्टर 2 मधील मोकळ्या जागेवर आसनव्यवस्था निर्माण करणे, धर्मवीर श्री संभाजी राजे उद्यान, प्रभाग क्रमांक 16 ऐरोली सेक्टर 4 मध्ये गजेबो  बांधकाम आणि प्रभाग क्रमांक 18 ऐरोली सेक्टर 5 मध्ये जय जवान असोसिएशन समोर दक्षिण मुख हनुमान मंदिराच्या  बाजूला  उद्यानात आसनव्यवस्था निर्माण करणे या कामांचा शुभारंभ करण्यात आला. एकूण 65 लाख रुपये आमदार निधीतून ही कामे होणार आहेत.

नाईक म्हणाले आम्ही जे बोलतो ते करतोच. मागील 20 वर्षे मालमत्ता आणि पाणीपट्टी वाढवणार नाही असा शब्द दिला होता तो पाळला. पुढील 20 वर्षे देखील करवाढ करणार नाही.

500 चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता कारमाफीचा निर्णय माझ्या सूचनेनुसार नवी मुंबई महापालिकेने राज्यात सर्वप्रथम घेतला.

501 ते 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांना 60 टक्के मालमत्ता करसवलत देण्याचा ठराव केला होता, मात्र राज्य सरकार अद्याप त्या प्रस्तावाला मान्यता देत नसल्याने नवी मुंबईकरांवर हा अन्याय असल्याची टीका आमदार नाईक यांनी केली.

कितीही षडयंत्र करा जनता आमच्यासोबत

विरोधकांचा समाचार घेताना आमदार नाईक यांनी कितीही षडयंत्र रचा जनता आमच्या सोबत आहे. सत्य नेहमी जिंकतेच असे सुनावले. 1995 पासून नवी मुंबईकर सुज्ञ आणि सुजाण जनता आमच्यासोबत आहे असेही ते म्हणाले.

…तर भोंगे वाजवू

अनावश्यक कामावरील उधळपट्टी सहन करणार नाही नवी मुंबईच्या हक्काचे पाणी पळवून नवी मुंबईकरांना तहानलेले ठेवणारे, नवी मुंबईचे सुविधा भूखंड पळविणाऱयांचे भोंगे वाजवू असे सांगत  नवी मुंबईची लूट करून जनतेच्या पैशाची उधळपट्टी सहन करणार नाही असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी राज्यातील सत्ताधार्‍यांना दिला आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply