Breaking News

पनवेलच्या शुद्ध हवेसाठी लोकप्रतिनिधी एकवटले

खारघर : प्रतिनिधी

खारघर, तळोजा आणि पनवेल या परिसरातील रहिवासी दिवसातील 17 तास प्रदूषित हवेचा श्वास घेत असल्याचे वातावरण फाउंडेशनने 13 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर 2020 या एक महिन्याच्या कालावधीत केलेल्या संशोधन अभ्यासातून समोर आले आहे.

पनवेल आणि लगतच्या परिसराच्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत असून अतिप्रदूषित हवेमुळे पनवेलकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत डॉ. संजीव मेहता यांनी पनवेलकर वासियांना सावधानतेचा इशारा दिला आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी एकत्रित येत बैठक घेतली.

पनवेल आणि लगतच्या परिसरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असल्यामुळे पनवेलकरांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पनवेल आणि लगतच्या परिसरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यावतीने धोरणात्मक उपायांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (दि. 20) ज्येष्ठ नागरिक संघ, पनवेल येथे क्लीन एअर फॉरपनवेल या उपक्रमांतर्गत स्थानिक नागरिक व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन वातावरण फाउंडेशन द्वारा करण्यात आले होते.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी वायू प्रदूषण हा विषय आपल्या सर्वांच्या जीवनासाठी अत्यावश्यक आहे. भावी पिढ्यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी स्वच्छ हवा गरजेची आहे. पनवेलमधील वाढत्या वायू प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक नागरिक, लोक प्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणांनी सामुहिक रीत्या प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी या वेळी मांडले. हवेची गुणवत्ता सुधारणे हि केवळ प्रशासनाची किंवा कोण्या एखाद्या संस्थेची किंवा एखाद्या व्यक्तीची जबाबदारी नसून त्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे ही काळाची गरज आहे, असेही ते या वेळी म्हणाले.

या वेळी डॉ. संजीव मेहता, भगवान केसभट, अल्लाउद्दीन शेख, गणेश कडू आदींसह नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply