Friday , June 9 2023
Breaking News

श्रीवर्धनमध्ये मिरवणूक

श्रीवर्धन : शिवजयंतीनिमित्त मंगळवारी सकाळी तालुक्यातील बागमांडला येथून शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूकीत डोक्याला भगवा फेटा बांधून अनेक तरुण तरुणी सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या मोटारसायकल व वाहनांना  भगवे लावण्यात आले होते. बागमांडला येथून काढण्यात आलेली ही मिरवणूक  हरिहरेश्वर, मारळ, काळींजे, सायगाव, निगडी, जसवलीमार्गे श्रीवर्धनमधील  शिवाजी चौकात आली. तेथे फटाक्याची आतिषबाजी तसेच गुलालाची उधळण करीत या मिरवणूकीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर आराठी, बोर्लीपंचायत व दिवेआगर मार्गे मिरवणूक दिघी येथे पोचली. तेथे या मिरवणूकीचा समारोप करण्यात आला.

Check Also

गाडी लावण्याच्या भांडणातून पेणमध्ये एकाचा मृत्यू; संतप्त जमावाकडून दुकानाची तोडफोड

पेण : प्रतिनिधी पेणमधील नाक्यावर दुकानासमोर गाडी लावण्याच्या वादातून झालेल्या किरकोळ भांडणात एकाच मृत्यू झाल्याची …

Leave a Reply