Breaking News

पनवेल, उरण परिसरातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव

जासई विद्यालयात गुणवंत विद्यार्थी, प्राध्यापकांचा सत्कार

उरण : प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेशोत्सव व इयत्ता बारावी विज्ञान व कला शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ झाला.

या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष, भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय महामंत्री आणि कामगार नेते सुरेश पाटील तसेच स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन अरुण जगे यांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य रयत शिक्षण संस्थेचे लाइफ वर्कर अरुण घाग यांनी केले. ज्युनिअर कॉलेजचा कला व विज्ञान या दोन्ही शाखांचा इयत्ता बारावीचा निकाल यावर्षी 100 टक्के लागला आहे. त्यानिमित्ताने मान्यवरांनी विद्यालयाचे प्राचार्य व सर्व प्राध्यापक वर्गाचे अभिनंदन केले, तसेच बारावीमध्ये विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी प्रणिता मोटे (70.17), द्वितीय क्रमांक शुभांगी नवांदे (69.17), तृतीय क्रमांक दिया पाटील (67.50) तसेच कला विभाग प्रथम क्रमांक सुहानी इंगोले (67.67), द्वितीय क्रमांक सुप्रिया घुटुकडे (62.83), तृतीय क्रमांक स्वाती माने (62.33) या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केला गेला.

सन 2022-23 या नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते त्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, चॉकलेट, पुस्तके पेन हे शैक्षणिक साहित्य देऊन केले गेले. शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष कामगार नेते व या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुरेश पाटील यांनी विद्यालयातील विज्ञान व कला या दोन्ही विभागांचा इयत्ता बारावीचा निकाल 100 टक्के लागल्याबद्दल समाधान व्यक्त करून प्राचार्य व सर्व प्राध्यापक यांचे विशेष अभिनंदन करून सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नुरा शेख यांनी मानले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply