Breaking News

मोदी सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवा -खासदार प्रकाश जावडेकर

मिशन लोकसभा 2024साठी भाजप होतोय सज्ज!

खोपोली ः प्रतिनिधी

मिशन लोकसभा 2024साठी भाजप सज्ज होत असून बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांनी जनसामान्यात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहचवावी, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रकाश जावडेकर यांनी रविवारी (दि. 19) येथे केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील रायगड जिल्ह्यात येणार्‍या उरण, पनवेल, कर्जत, खालापूर या तालुक्यांतील बूथ कमिटी कार्यकर्त्यांची भाजप नेते खासदार प्रकाश जावडेकर संवाद सादर असून पक्ष संघटना अधिक मजबूत व कार्यक्षम कशी होईल यासाठी मार्गदर्शन करीत आहेत. या अंतर्गत त्यांनी रविवारी खोपोली येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी खासदार जावडेकर यांनी प्रत्येक पदाधिकार्‍याशी संवाद साधून आगामी निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे तयारी करावी याबाबत बहुमुल्य मार्गदर्शन केले. जनसामान्यांमध्ये भाजपची प्रतिमा दिवसेंदिवस उज्ज्वल होत आहे. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मोदी सरकारच्या योजनांची माहिती देऊन जनतेशी सुसंवाद साधावा, असे त्यांनी सूचित केले. प्रारंभी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील तसेच भाजप शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांनी खासदार जावडेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अ‍ॅड. राजेंद्र येरुणकर यांनीही सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली. जिल्हा संघटक अविनाश कोळी यांचा वाढदिवस असल्याने जावडेकरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या, तर ज्येष्ठ साहित्यिक र. वा. दिघे यांच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकाची प्रत वामनराव दिघे यांनी जावडेकरांना दिली. या बैठकीला भाजप जिल्हा संघटक अविनाश कोळी, सरचिटणीस दीपक बेहरे, चिटणीस रमेश मुंडे, खोपोली शहराध्यक्ष खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद पिंगळे, महिला मोर्चा शहर अध्यक्ष शोभा काटे, सरचिटणीस अश्विनी अत्रे, जिल्हा कोषाध्यक्ष रसिका शेटे, भाजप शहर चिटणीस गोपाळ बावस्कर, युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंगुळकर, सरचिटणीस विनायक माडपे, सिद्धेश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते वामनराव दिघे, हिंमतराव मोरे, विजय तेंडुलकर, कामगार आघाडी सेलचे अनिल कर्णूक, मीडिया सेलचे राहुल गायकवाड, माजी नगरसेविका अनिता शहा, सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply