Breaking News

रस्त्यांवरील खड्डे पावसाळ्यापूर्वी भरावेत; खोपोली भाजपची मागणी

खोपोली ः प्रतिनिधी

नगरपालिका हद्दीतील सर्वच रस्त्यांची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाल्याने हे खड्डे पावसाळ्यापूर्वी भरण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन खोपोली भाजप अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्याधिकारी गणेश शेटे यांना दिले. या वेळी नगराध्यक्षांचे प्रतिनिधी ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल उपस्थित होते.

खोपोली शहरातील सर्वच प्रभागांतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. शहरातील एकही रस्ता सुस्थितीत नाही. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. अनेकदा किरकोळ अपघात होत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत असले तरी या प्रश्नाकडेही प्रशासनाने दुर्लक्ष करून चालणार नाही. तातडीने पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी भाजपने निवेदनात केली आहे. 

शहर अध्यक्ष खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली शहर सरचिटणीस हेमंत नांदे, शहर चिटणीस ईश्वर शिंपी, माजी शहर अध्यक्ष दिलीप निंबाळकर, विजय तेंडुलकर, युवा नेते सचिन मोरे आदी या वेळी उपस्थित होते. पावसाळा तोंडावर आल्यामुळे आता डांबरीकरण शक्य नाही, पण खड्डे पावसाळ्यापूर्वी भरले जातील, असे आश्वासन नगराध्यक्षांचे प्रतिनिधी मोहन औसरमल यांनी दिले आहे.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply