Breaking News

धुतूम येथील मैदानाला हुतात्मा रघुनाथ ठाकूर यांचे नाव

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण

उरण : बातमीदार
उरण तालुक्यातील धुतूम गावात ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल) कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या मैदानाला 1984च्या शेतकरी आंदोलनात हुतात्मा झालेले रघुनाथ अर्जुन ठाकूर यांचे नाव देण्यात आले आहे. या मैदानाच्या नामफलकाचे अनावरण सोमवारी (दि. 27) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी या मैदानात समालोचन कक्ष उभारण्यासाठी पाच लाख रुपये देण्याचे जाहीर केले.
शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कांसाठी सन 1984मध्ये गौरवशाली आणि शौर्यशाली शेतकरी लढा लढला गेला. या लढ्यात पाच जणांना हौतात्म्य आले. यामध्ये धुतूम गावातील रघुनाथ अर्जुन ठाकूर हेही हुतात्मा झाले होते. त्यांचे बलिदान कायमस्वरुपी स्मरणात रहावे तसेच तरुण पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी धुतूम ग्रामपंचायतीने ग्रामसभेत सर्वानुमते ठराव संमत करून गावच्या मैदानाचे हुतात्मा रघुनाथ ठाकूर खेळाचे मैदान असे नामकरण केले आहे. हे मैदान टीआयपीएल कंपनीच्या माध्यमातून बनविण्यात आले. या मैदानाच्या नामफलकाच्या अनावरण लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले असून या वेळी त्यांनी या मैदानात समालोचन कक्ष उभारण्यासाठी पाच लाख रुपये देण्याचे जाहीर केले.
या कार्यक्रमाला काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, माजी जि. प. सदस्य डॉ. मनीष पाटील, वैजनाथ ठाकूर, सरपंच रेश्मा ठाकूर, उपसरपंच शरद ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य सदानंद ठाकूर, अंगत ठाकूर, रविनाथ ठाकूर, वैशाली पाटील, आशा ठाकूर, पूजा ठाकूर, माजी सरपंच शंकर ठाकूर, प्रकाश ठाकूर, रामनाथ ठाकूर, हुतात्मे पुत्र लक्ष्मण रघुनाथ ठाकूर व परिवार, डी. आर. ठाकूर, दीपक मढवी, मुरली ठाकूर, विनोद पाटील, संजय ठाकूर, बळीराम बाळू ठाकूर, संजय मोहन ठाकूर, कुंदन पाटील, प्रभाकर ठाकूर, रामचंद्र ठाकूर, महेंद्र ठाकूर, अभय ठाकूर, संदीप ठाकूर, अरुण ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर, मेघनाथ ठाकूर, अमित ठाकूर, राजेश ठाकूर, नंदू ठाकूर, निलेश ठाकूर, संदेश ठाकूर, तुकाराम ठाकूर, नंदेश ठाकूर यांच्यासह ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply