पनवेल : रामप्रहर वृत्त
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात गेली तीन दशके उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजप उलवे नोड यांच्या संयुक्त विद्यमाने गव्हाण विभागातील गरजू विद्यार्थ्यांना सोमवारी (दि. 5) भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
शिवाजीनगर जि.प. शाळा, कोपर जि.प. शाळा, गव्हाण कन्या शाळा व गव्हाण जि.प. शाळा या विद्यालयांतील विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, पांडुशेठ घरत, वसंत पाटील, भाजपचे तालुका चिटणीस जयवंत देशमुख, वाहतूक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत ठाकूर, उलवे नोड उपाध्यक्ष अनंता ठाकूर, वसंतशेठ पाटील, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, माजी उपसरपंच रामदास ठाकूर, कोळी समाज अध्यक्ष विश्वनाथ वामन म्हात्रे, भाऊ भोईर, माजी ग्रामपंचायत सदस्य स्नेहलता ठाकूर, जयश्री कोळी, उषा कोळी, पूर्वा वास्कर, रघुनाथ देशमुख, सुधीर ठाकूर, साईनाथ मोकल, कोपर शाळा चेअरमन अनंता ठाकूर, निलेश ठाकूर, शिवाजी नगर गाव उपाध्यक्ष व्ही. के. ठाकूर, जी. के. ठाकूर, टी. के. ठाकूर, आशा म्हात्रे, वर्षा कोळी, अजय भगत, सुहास भगत, किशोर ठाकूर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेलजवळील आसूडगाव जि.प.शाळेतही भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात आले. या वेळी ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, शशिकांत शेळके, मनोहर म्हात्रे, रमेश नाईक, बालन नाईक आदी उपस्थित होते.
Check Also
कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक
कठोर उपाययोजना करणार -वनमंत्री गणेश नाईक पनवेल : रामप्रहर वृत्तकोकणातील आंबा व काजू बागांचे वणव्यांमुळे …
RamPrahar – The Panvel Daily Paper