Breaking News

रायगड जि.प., पं.स.चा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी सोडत काढणे तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आपापल्या क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती-जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित महिलांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत.
सर्व ठिकाणी 13 जुलै रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असून आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी, संबंधित तहसीलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी 15 ते 21 जुलै आहे. जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात सकाळी 11 वाजता होणार्‍या सभेत काढली जाणार आहे, तर अलिबाग, मुरूड, पेण, पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, रोहा, सुधागड, माणगाव, तळा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा यांची आरक्षण सोडत सभा संबंधित कार्यालयांच्या सभागृहात होती.
जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची या सभेस हजर  राहण्याची इच्छा आहे, त्यांनी वरील ठिकाणी व वेळी हजर राहावे, असे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply