पनवेल ः वार्ताहर
पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 19मध्ये गुणे हॉस्पिटल, भाजी मार्केट आणि टपाल नाका येथे काही दिवसांपूर्वी राजू सोनी यांच्या नगरसेवक निधीतून हायमास्ट पथदिवे बसविण्यात आले होते. याचे उद्घाटन मंगळवारी (दि. 26) सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, महापालिका अधिकारी प्रितम पाटील, भाजप प्रभाग 19चे अध्यक्ष पवन सोनी, चंद्रकांत मंजुळे, राजू कोळी, मंदार देसाई, तुषार कापरे, अरुण मालपाणी, सुनील खळदे, प्रशांत गायकवाड, सुभाष पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper