Breaking News

पोलिसाने केला वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा

पनवेल : वार्ताहर

नवी मुंबई पोलीस दलातील जलद प्रतिसाद पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले स्वप्नील लाटे यांनी त्यांचा वाढदिवस कोप्रोली येथील कै. रामचंद्र कुरुळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था आदिवासी कर्णबधिर-मतिमंद निवासी विद्यालयातील मुलांना क्रिकेट खेळाचे साहित्य, तसेच भेटवस्तू देऊन त्याठिकाणी वाढदिवस साजरा केला.

याचबरोबर नवीन पनवेल येथील साई आश्रय या निराधार वृद्धाश्रमात साजरा केला. या वेळी तसेच निराधार वृद्ध, महिला, पुरुष यांना भेटवस्तू, फळे व मिठाईचे वाटप करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

या वेळी साई आश्रय वृद्धाश्रमचे किरण पाटील, ज्योती पाटील, आदिवासी कर्णबधिर व मतिमंद निवासी विद्यालयाचे सौ.ललिता कुरुळकर, प्रफुल चुनेकर, मनोज कुरुळकर, यांच्यासह जलद प्रतिसाद पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल अनिकेत कुंभार, पत्रकार केवळ महाडिक, रवींद्र गायकवाड, संतोष आमले, अनुराग वाघचौरे हे उपस्थित होते.

Check Also

उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …

Leave a Reply