Breaking News

कशेडी घाटात अपघात; चोळई गावाजवळ ट्रक उलटला

पोलादपूर : प्रतिनिधी

कशेडी घाटातील चोळई गावाजवळील वळणावर बुधवारी (दि. 13) पहाटेच्या सुमारास ट्रक पलटी झाला. या अपघातात कलंडलेल्या ट्रकचे तुकडे झाले.

चालक सुनील सोपान वाघमारे हा आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-43,जे-9855) घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरून कल्याणकडे येत होता. कशेडी घाटातील चोळई गावच्या हद्दीत पहाटे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या विरुध्द दिशेस जाऊन दोन वेळा पलटी झाला. या अपघातात ट्रकचे तुकडे तुकडे झाले. चालक सुनील वाघमारे जखमी झाले असून, त्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …

Leave a Reply