Breaking News

कर्जत एसटी आगार आपल्या दारी!; शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना दिले मासिक पास

कर्जत : प्रतिनिधी

दोन वर्षांनंतर सुरू झालेल्या नेरळ-कळंब एसटी बसमुळे त्या परिसरातील विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली आहे. बारावीपर्यंत शिकणार्‍या विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर योजनेतून एसटी तर्फे मोफत पास दिले जातात. तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास दिले जातात. हे पास कर्जत आगारात येऊन काढणे खर्चिक व वेळेचा अपव्यय होणारे असल्याने आगार व्यवस्थापकांनी थेट शाळेत जाऊन 221 विद्यार्थ्यांना पास दिले. दोन वर्षे कोविडच्या संकटामुळे शाळा व महाविद्यालये बंद होते, मात्र ऑनलाइन शिक्षण सुरू होते. आता निर्बंध नसल्याने शाळा व महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. दरम्यान, रस्त्याच्या कामामुळे नेरळ-कळंब मार्गावरील एसटी सेवा बंद होती. 22 सप्टेंबरला ही  एसटी सेवा सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाण्या-येण्यासाठी एसटी बस परवडते. त्यातच बारावीपर्यंत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींना मोफत पास योजना आहे तर विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात मासिक पास मिळतो. हे पास विद्यार्थ्यांना विनाप्रयास मिळावेत म्हणून कर्जत एसटी आगार व्यवस्थापक शंकर यादव यांनी विभागीय वाहतूक अधिकारी प्रमोद खरे, अधिकारी अशोक पवार यांच्यासह नेरळ-कळंब मार्गावरील पोशीर गावातील श्रमजीवी विद्या मंदिरमध्ये जाऊन 62 विद्यार्थ्यांना मासिक पास दिले. तसेच अहिल्याबाई होळकर योजनेच्या माध्यमातून 159 विद्यार्थिनींना मोफत पास दिले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते दिनेश भोईर उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply