Breaking News

कर्जत न.प. मध्ये ध्वज वितरण कक्ष

कर्जत : प्रतिनिधी

नगर परिषद कार्यालयात ध्वज वितरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. कर्जत शहरातील प्रत्येक प्रभागात ध्वज मिळण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. स्वयंसेवी संस्था, मंडळ, इच्छुक स्वयंसेवकांनी, सर्व नागरिकांनी  भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे आणि तिरंग्याचा सन्मान करावा, असे आवाहन नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी केले आहे.

कर्जत नगर परिषद घरोघरी तिरंगा या मोहिमेअंतर्गत कामाचा आढावा घेण्याकरिता बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, सभापती राहुल डाळींबकर उपस्थित होते. त्यांनी कर्मचार्‍यांकडून कामाचा आढावा घेवून पुढील रुपरेषा ठरवली. त्यानंतर नगर परिषद कार्यालयात ध्वज वितरण कक्ष सुरू करण्यात आला.

Check Also

तळोजा मजकूरमध्ये शिवरायांच्या मंदिराचा वर्धापन दिन

तळोजा : रामप्रहर वृत्ततळोजा मजकूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा पहिला वर्धापन दिन रविवारी …

Leave a Reply