Breaking News

रोगप्रतिकारक गोळ्या वाटपाचा उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील पडघे गावचे माजी सरपंच कृष्णाशेठ पाटील यांच्यामार्फत आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

कृष्णाशेठ पाटील सामाजिक विकास मंडळाच्या वतीने हा उपक्रम पडघे गावात राबविण्यात येणार आहे. आयुष मंत्रालयाच्या शिफारशीनुसार दिल्या जाणार्‍या या गोळ्यांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. वाटपावेळी जर चुकून कुणाला गोळ्यांचा डोस मिळाला नाही, तर पाटील यांच्या निवासस्थानी येऊन घेऊन जावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

परेश ठाकूर यांची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

पनवेलसह रायगडच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची (एमबीए) ८४वी चतुर्वार्षिक …

Leave a Reply