Breaking News

दुर्गम भागात मिठाईचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी

रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी विभागानजीकच्या सारसई या दुर्गम भागातील आदिवासी, धनगर तसेच इतर बांधवांना दीपावलीनिमित्त काहीतरी मदत व्हावी यासाठी जनसेवा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष शिंगाडे यांनी मिठाईचे वाटप केले. या वेळी दुर्गम भागातील लहानग्यांना मिठाईचे विविध पदार्थ चाखायला मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसले. दरम्यान, जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने भिलवले दामखिंडी येथील आदिवासी बांधवांना कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी तो एकत्रित करता यावा यासाठी मान्यवरांच्या उपस्थितीत डस्टबिनचे वाटप करण्यात आले. या वेळी धनगर समाज कर्जत तालुका अध्यक्ष रामदास कोकरे, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष भाऊ शिंगाडे, बाबू गोरे, गोविंद गोरे, जगन गोरे, दत्ता कोकरे, बाळू आखाडे, रामा झोरे, उमेश कोकरे, राम गोरे, अनंत आखाडे आदी उपस्थित होते.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply