महिलांसाठी रक्त तपासणी शिबिराचाही स्तुत्य उपक्रम
पनवेल ः रामप्रहर वृत्त
श्रावण महिन्यानिमित्त मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी नवीन पनवेल सेक्टर 13 येथील कालिमाता मंदिरात केले होते. त्याचबरोबर डायबेटीस हेल्थ फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून वीर वूमन फाउंडेशनच्या अर्चना परेश ठाकूर उपस्थित होत्या. या कार्यक्रमास पं. स. सदस्य तथा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, रूचिता लोंढे, माजी नगराध्यक्षा स्मिता वाणी, महिला मोर्चा शहर अध्यक्ष वर्षा नाईक, प्रदेश सरचिटणीस सुहासिनी केकाणे, सरचिटणीस नीता माळी, लीना पाटील, प्रतिभा भोईर, भटके विमुक्त आघाडी शहर उपाध्यक्ष अंजली इनामदार, मयुरी उन्नटकर आदी पदाधिकारी, कार्यकर्त्या महिला उपस्थित होत्या. या वेळी स्त्रियांनी पारंपरिक नृत्य सादर करीत मोठ्या आनंदोत्सवात हा कार्यक्रम साजरा केला. त्याचप्रमाणे महिलांसाठी रक्त तपासणी शिबिर झाले. या शिबिरात अर्चना ठाकूर यांनी रक्त तपासणी करून घेतली. वृषाली वाघमारे यांनी सर्वांचे आभार मानले.