Breaking News

माणगाव नळ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी

आमदार भरत गोगावले यांच्या प्रयत्नांना यश

माणगाव : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत माणगाव तालुक्यात अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना मंजूरी मिळाली असून, लवकरच ही कामे मार्गी लावू, अशी आमदार भरत गोगावले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.  आमदार भरत गोगावले यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशाने माणगाव तालुक्यातील कोस्ते खुर्द, मशिदवाडी, मांजुर्णे, भागाड, थरमरी, केळगण, सांगी, जावठे, कडापुर आणि सणसवाडी या गावातील पाणीपुरवठा योजनांना जलजीवन मिशन योजने अंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. नामदार उदय सामंत यांच्या मुंबईतील निवासस्थानी आमदार भरत गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते  शासकीय मान्यता मिळालेल्या कामांची प्रत देण्यात आली. या वेळी कोस्ते खुर्द ग्रामस्थ नितीन पवार, मनोज सावंत, प्रसाद जाधव, सचिन मोरे, संतोष जाधव उपस्थित होते.

मंजूर पाणीपुरवठा योजना व खर्च

कोस्ते खुर्द  : 1 कोटी 88लाख 14 हजार 719

मशिदवाडी  : 18 लाख 9 हजार 894 रु.

मांजुर्णे : 44 लाख 57 हजार 820 रु,

भागाड  : 92 लाख 49 हजार 148 रु,

थरमरी : 1 कोटी 18 लाख 46 हजार 370 रु.

केळगण :  86 लाख 75 हजार 523 रु,

सांगी : 55 लाख 30 हजार 331 रु,

जावठे : 62 लाख88 हजार 695 रु,

कडापुर :  51 लाख 59 हजार 603 रु,

सणसवाडी : 1 कोटी 28 लाख 75 हजार 466

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply