Breaking News

ना. प्रल्हादसिंह पटेल यांची पालीत बाईक रॅली

पाली : प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होणार्‍या व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रत्येक योजनेचा उद्देश सफल करण्यासाठी तळागाळात लाभार्थी घटकापर्यंत जाऊन काम करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी कार्यकर्त्यांना केले. सुधागड तालुक्यातील पालीतील अष्टविनायक तीर्थक्षेत्री श्री बल्लाळेश्वराचे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी बुधवारी (दि. 24) दर्शन घेतले. या वेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून भाजपचे झेंडे फडकावत त्यांचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकात जाऊन महाराजांना अभिवादन करण्यात आले. ना. प्रल्हादसिंह पटेल यांनी येथील वावे गावात जनसंघ व विचार परिवार समन्वय सदस्यांशी संवाद साधला. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष राजेश मपारा, तालुकाध्यक्ष दादा घोसाळकर, युवा नेते वैकुंठ शेठ पाटील, सरचिटणीस सागर मोरे, सरपंच श्रद्धा कानडे, गणेश कानडे, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, सचिन मोदी, आलाप मेहता, शिरीष सकपाळ, केतन देसाई, रोहन दगडे, श्रीकांत ठोंबरे, गणेश सावंत, वैशाली मपारा, आरती भातखंडे, जुईली ठोंबरे, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply