पनवेल : रामप्रहर वृत्त
दिवाळीच्या पारंपरिक प्रकाशोत्सवाबरोबरच साहित्यिक तेजाने उजळणारे विविध दिवाळी अंक हे समाजातील सृजनशीलतेचे प्रतीक आहेत. अशाच काही दर्जेदार दिवाळी अंकांचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी पनवेल येथे त्यांच्या निवासस्थानी पार पडले. या सोहळ्यात अनिल रॉय संपादित ‘स्टार पनवेल’, दिपाली पारसकर यांचा ‘युथ महाराष्ट्र’, तसेच सनीप कलोते संपादित ‘क्षितीज पर्व’ या दिवाळी अंकांचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, संजय कदम, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक उपाध्यक्ष सय्यद अकबर, राज भंडारी, विशाल सावंत, आनंद पवार, गौरव जहागीरदार, चंद्रकांत शिर्के, केवळ महाडिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, दिवाळी अंक ही आपल्या साहित्य-संस्कृतीची जपणूक करणारी आणि विचारविनिमयाची महत्त्वपूर्ण परंपरा आहे. नवोदित लेखकांना आपले विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी हे व्यासपीठ प्रेरणादायी ठरते असे सांगितले तर संपादकांनी आपल्या-आपल्या अंकांची वैशिष्ट्ये आणि विषयांच्या मांडणीबद्दल उपस्थितांना
माहिती दिली.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper