Breaking News

पनवेलमध्ये रस्ता काँक्रीकरणाचे उद्घाटन

मान्यवरांची उपस्थिती; रूचिता लोंढे यांच्या कार्याचे कौतुक

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल शहरातील ताम्हणे बंगला ते शहा प्लाझापर्यंतच्या रस्त्यालगतच्या गटारांचे व संपूर्ण रस्त्याचे स्टँम्पकाँक्रीटीकरण झाले आहे. नागरिकांना होणार्‍या समस्यांची दखल घेऊन या कामांसाठी माजी नगरसेविका रूचिता लोंढे यांनी पाठपुरावा करून महापालिकेच्या माध्यमातून हे काम मंजुर करून आणले होते. त्यानुसार या रस्ता काँक्रीटकरणाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि भाजप महिला मोर्चाच्या माजी जिल्हाध्यक्ष कल्पना राऊत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 27) झाले. पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका रूचिता लोंढे यांनी पनवेल शहरातील ताम्हणे बंगला ते शहा प्लाझापर्यंतच्या रस्त्यालगतची गटारांचे व संपूर्ण रस्त्यांचे स्टँम्पकाँक्रीटीकरण करण्यासंदर्भात पाठपुरावा केला होता. त्यानुसार पनवेल महापालिकेच्या माध्यमातून 20 लाख 19 हजार 242 रुपये खर्च करून ही कामे करण्यात आली. त्यामुळे शनिवारी या विकासकामाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कामाचे उद्घाटन महिला मोर्चाच्या माजी जिल्हाध्यक्ष कल्पना राऊत यांच्या हस्ते आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थितीत झाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून माजी नगरसेविका रूचिता लोंढे यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर तयार केलेल्या डिजीटल आरती संग्रहाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. या कार्यक्रमांना पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक नितीन पाटील, राजू सोनी, माजी नगरसेविका रूचिता लोंढे, भाजप नेते नंदु पटवर्धन, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस अमरीश मोकल, खजिनदार संजय जैन, गुरुनाथ लोंढे, महिला मोर्चाच्या माजी जिल्हाध्यक्ष कल्पना राऊत, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, अंजली इनामदार, सपना पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply