Breaking News

ज्येष्ठ नागरिकांचे महापौरांना निवेदन

पनवेल ः प्रतिनिधी

नवीन पनवेल येथील सेक्टर 11मधील फ्लाईट लेप्टनंट तुषार श्यामराव चव्हाण उद्यान येथे वीज व शौचालयाची व्यवस्था करण्याबाबत परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी पनवेल मनपा महापौर डॉ. कविता चौतमोल यांना सोमवारी (दि. 20) निवेदन सादर केले. या प्रश्नाबाबत महापौर डॉ. कविता चौतमोल यांची ज्येष्ठ नागरिकांसोबत बैठक झाली. या वेळी महापौरांना 60 ज्येष्ठ नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले. या बैठकीत येथील वीज व शौचालय व्यवस्थेचे काम त्वरित करण्याबाबत निश्चित करण्यात आले. या वेळी पालिका अधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक किसन पवार, बापनासाहेब, डॉ. शशिकांत म्हात्रे, अनंत भेडे, सुशील शर्मा, मारुती कांबळे आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply