पनवेल ः शहरामध्ये ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट अॅण्ड जनरल कामगार युनियनचे मुख्य कार्यालय सुरू झाले आहे. नव्याने सुरू झालेल्या या कार्यालयाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी कामगार नेते महेंद्र घरत, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण, माजी नगरसेविका नीता माळी, उद्योजक अस्लम मुन्सी, युनियनचे अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी, सरचिटणीस अल्ताफ सैय्यद, उपाध्यक्ष समिरी तांबोळी, चिटणीस वैभव पाटील, सहचिटणीस गुरुदीप सिंह, खजिनदार फिरोज सय्यद यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या समारंभावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
Check Also
भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …
RamPrahar – The Panvel Daily Paper
