Breaking News

जवान राहुल भगत यांच्यावर कांबळेतर्फे महाड येथे अंत्यसंस्कार

जवान राहुल भगत यांच्यावर कांबळेतर्फे महाड येथे अंत्यसंस्कार

महाड : प्रतिनिधी
तालुक्यातील कांबळे तर्फे महाड येथील
(मुळ रा. पिंपळदरी, जि. हिंगोली) जवान राहुल भगत यांना काश्मीर सीमेवर देशाचे रक्षण करताना वीरमरण आले. या शहीद जवानावर बुधवारी (दि. 5) सकाळी शाश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.
राहुल भगत हे 2015 मध्ये भारतीय सैन्यदलात शिपाई म्हणून भरती झाले होते. सात वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. बारामुल्ला सीमेवर पहारा देत असताना गोळी लागल्याने जवान राहुल भगत शहिद झाले. मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास राहुल भगत याचे पार्थिव कांबळे तर्फे महाड येथे आणण्यात आणले. या वेळी त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. घरासमोर केलेल्या चौथर्‍यावर राहुल याचे पार्थिव अंतिम दर्शनाला ठेवण्यात आले. आमदार भरत गोगावले यांनी भगत कुटुंबियांचे सांत्वन केले.
बुधवारी सकाळी बौद्ध पद्धतीने धार्मिक विधी केल्यानंतर शहीद राहुल याचे पार्थिव फुलांनी सजवलेला वाहनावर ठेवून स्मशानभूमीत नेण्यात आले. तेथे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार सुरेश काशीद, सरपंच राघोबा महाडिक यांच्यासह तालुक्यातील नागरिक, निवृत्त सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply