Breaking News

शहीदांच्या कुटुंबांना देणार घरे; ‘क्रेडाई’ची घोषणा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

‘क्रेडाई’ (द कॉनफिड्रेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया) या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना टू बीएचके घरे देणार असल्याची घोषणा केली. संघटनेच्या अधिकार्‍यांनी याबाबतचे एक पत्रक जारी केले आहे. ‘क्रेडाई’चे अध्यक्ष असणार्‍या जेक्सी शाह यांनी याबद्दल अधिक माहिती दिली. ‘आम्ही शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांच्या दुख:द काळात त्यांच्या सोबत आहोत. आमच्या संघटनेने या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या प्रत्येक जवनाच्या कुटुंबाला त्यांच्या राज्यामधील त्यांच्या राहत्या शहरामध्ये टू बीएचके फ्लॅट देण्याचा निर्णय घेतला आहे’, असे शाह यांनी सांगितले. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना या कठीण प्रसंगामधून सावरण्याची ताकद मिळो, हीच ‘क्रेडाई’चे सदस्य असणार्‍या 12 हजार 500 सदस्यांची प्रार्थना आहे, असेही शाह यांनी सांगितले. ‘क्रेडाई’ ही देशभरातील बांधकाम व्यावसायिकाच्या सर्वांत मोठ्या संस्थांपैकी एक आहे. देशातील 23 राज्यांमधील 203 लहान मोठ्या शहरांमध्ये ‘क्रेडाई’चे सदस्य असणार्‍या बांधकाम व्यावसायिकांचे गृहनिर्माण प्रकल्प आहेत.

Check Also

भूपेंद्र बारसिंग यांच्या हस्ते वृक्षारोपण

सांगली : प्रतिनिधी विटा येथील यशोधन बहुउद्देशिय कल्याणकारी संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करण्याचा सामाजिक उपक्रम राबविण्यात …

Leave a Reply