कळंबोली : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कळंबोली शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या माध्यमातून ही कामे होत आहेत.
सिडकोनिर्मित असलेल्या कळंबोली शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळे रस्ते डागडूजीसंदर्भात माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील यांनी सिडकोकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर सिडकोने कळंबोली शहरातील रस्ते पनवेल महापालिकेकडे हस्तांतरीत केले. त्यानुसार महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात आला. याची दखल घेत महापालिकेच्या माध्यमातून प्रभाग 7 मधील सेक्टर 17 व 20 मधील रस्ते दुरुस्ती कामांना सुरुवात करण्यात आली. पुढे शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यात येणार आहेत.
या कामाची पाहणी माजी नगरसेवक अमर पाटील यांनी केली. या वेळी मुख्य अभियंता संजय कटेकर, अभियंता विनायक जाणे, सुधीर साळुंखे, ठेकदार आदी उपस्थित होते.
Check Also
समरसता संकल्प अभियानांतर्गत पनवेलमध्ये कार्यक्रम; विद्यार्थ्यांचा गौरव
संत रोहिदास महाराजांच्या कार्याला मान्यवरांकडून उजाळा पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या वतीने संत रोहिदास …
RamPrahar – The Panvel Daily Paper