पनवेल : रामप्रहर वृत्त
तालुक्यातील न्हावेखाडी येथील श्री म्हसेश्वर मंदिर परिसरात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली साकारण्यात आलेल्या रामबाग या उद्यानाचा लोकार्पण सोहळा व त्यानिमित्त सत्यनारायण महापूजा गुरुवारी (दि. 22) सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या सोहळ्यानिमित्त हिंदी, मराठी, कोळीगीत, नृत्याविष्कार व हास्याचा डबलबार यांचा समावेश असलेला सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यामध्ये ‘सूर नवा ध्यास नवा’ फेम पार्श्वगायक मंदार पिलवलकर, श्वेता सुरेश ठाकूर, शुभम सातपुते, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम विनोदी अभिनेत्री शिवाली परब, डान्स+ फेम एस. एस. डान्स फॅमिली ग्रुप, याल तर हसाल फेम संजीवन म्हात्रे हे कलाकार आपली कला सादर करतील. या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिर कमिटी अध्यक्ष सी. एल. ठाकूर यांनी केले आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …