माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण
पनवेल ः रामप्रहर वृत्त
रोटरी घनदाट जंगल प्रकल्प अंतर्गत रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरातील भूखंड क्रमांक 273 येथे मियावाकी पद्धतीने डेंस फॉरेस्ट तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पनवेल महानगर पालिकेच्या मालकीच्या भूखंड क्रमांक 273 येथे डेंस फॉरेस्ट तयार करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलला देण्यात आला आहे. या प्रकल्पात लक्ष्मी आय चॅरिटेबल हॉस्पिटल शेजारील नियोजित जागी मियावाकी पद्धतीने डेंस फॉरेस्ट तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पाद्वारे वनीकरणाला चालना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास ‘रोटरी’चे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे, माजी नगरसेवक अनिल भगत, माजी नगरसेवक नितीन पाटील, बांधकाम व्यावसायिक मंगेश परुळेकर, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, सचिव अनिल ठकेकर, प्रोजेक्ट चेअरमन सुदीप गायकवाड, अमोद दिवेकर, अभय गुरसळे, डॉ. सुरेश मोरे, श्री वेलणकर, भगवान पाटील, प्रिया पाटील, श्री सैतवडेकर, जे.डी. तांडेल, मेघा तांडेल, रतन खरोल, अनिल खांडेकर, सिकंदर पाटील, डॉ. मिलिंद घरत, डॉ. आवटे, शैलेश पोटे, भारत ठाकूर, आरती खेर, आतिष थोरात, अमित पुजारी, संतोष घोडींदे, सुनिल गाडगीळ, दीपक गडगे, दर्शन वनगे, मनोज आंग्रे, आनंद रंगपरिया यांच्यासह रोटरीचे सदस्य होते.