Breaking News

मातीचा ढिगारा उचलला

भाजपच्या विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा

पनवेल : वार्ताहर

पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याने नवीन पनवेल सेक्टर 3 मधील मातीचा ढिगारा उचलण्यात आला.

प्रभाग 18 मधील नवीन पनवेल सेक्टर 3 मध्ये स्टील मॅन सोसायटी समोरील असलेल्या उद्यानालगत अनेक दिवस मातीचा ढिगारा पडला होता व याला कचराकुंडीचे स्वरूप येत चालेले होते. याबाबत सूचना विक्रांत पाटील यांच्याकडे आल्या होत्या. कर्तव्यदक्ष माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी त्वरित महापालिका अधिकार्‍यांशी संपर्क साधून नागरिकांना त्रासदायक ठरत असलेल्या मातीचा ढिगारा उचलण्यास सांगण्यात आले.

अधिकार्‍यांनी सकारत्मक प्रतिसाद देत मातीचा ढिगारा उचलून घेतला. माजी नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमी तत्परतेने समस्या सोडवतात याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Check Also

Have you been on the e, utilizing the thrill off a genuine gambling enterprise sense?

Finest Crazy Go out Gambling establishment Web sites elizabeth Online Uk Do you really discover …

Leave a Reply