Breaking News

पाणपक्षांची माहिती देणारे संकेतस्थळ, माहिती पुस्तिकेचे प्रकाशन
पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत आशियाई पाणपक्षी गणना 2023 या विषयास अनुसरून आशियाई पाणपक्षांची माहिती देणारे संकेतस्थळ व माहिती पुस्तिकेचे प्रकाशन आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते वडाळे तलाव येथे नुकतेच झाले. महापालिका क्षेत्रातील वडाळे तलाव, खांदेश्वर तलाव, तसेच इतर पाणथळ तलावांमध्ये हिवाळ्यात परदेशातून विविध प्रकारचे पक्षी येतात. त्यांची माहिती होण्याच्या दृष्टीने ’आशियाई पक्षी गणना 2023’ ही माहिती पुस्तिका छापली असल्याचे उपायुक्त कैलास गावडे यांनी सांगितले, तसेच ही माहिती http://www.birdsofpanvel.blogspot.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून येत्या काळात जसजशी नवीन पक्षांची माहीती मिळेल तसतशी त्यांची माहिती या ब्लॉगवर प्रसारित करण्यात येणार आहे. यानिमित्ताने छापण्यात आलेल्या विशेष टिशर्टचे अनावरण या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना स्थलांतरीत पक्षाची माहिती व्हावी यासाठी त्यांच्या फोटोसह नावांचे पोस्टर्स याठिकाणी मांडण्यात आले होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply