Breaking News

पनवेल मनपातर्फे कुष्ठरोग जनजागृती

30 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत स्पर्श अभियान
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेमार्फत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येणार आहेत. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या पंधरवड्यात कुष्ठरोगाविषयी विविध आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावरती राबविण्यात येणार आहेत. कुष्ठरोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी महापालिकेचा वैद्यकिय आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने 30 जानेवारी रोजी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरती कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानूसार मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. महापालिका आणि सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कृष्ठरोग) अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमानातून 30 जानेवारी रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र खारघर येथे सर्व आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांची मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. दिनांक 03 फेब्रुवारी रोजी फडके नाट्यगृहात कुष्ठरोगाविषयी जनजागृती या विषयावर आरोग्य कर्मचार्‍याच्या रांगोळी स्पर्धांचे तसेच कर्करोग विषयी जनजागृती पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधित ना्गरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील ‘सपना’ या काल्पनिक संकल्पनेसह शाळकरी मुली मार्फत कुष्ठरोग विषयी माहिती व संदेश देऊन रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत शिक्षणा विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा आयोजित करण्यात करण्यात आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-5 खारघर यांच्यावतीने कुष्ठरोगाविषयी दिनांक 3 फेब्रुवारी रोजी पथनाट्य सादर करण्यात येणार आहे.

आरोग्य केंद्रात शपथ
स्पर्श जनजागृती अभियान व कुष्ठरोग निवारण दिनाच्या पार्श्वभूमीवरती मुख्यालयात 26 जानेवारी रोजी वैद्यकिय आरोग्य विभाग मुख्यालय, तसेच सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रतिनिधी यांनी शपथ घेतली.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply