उरण : बातमीदार
उरण तालुक्यातील भेंडखळ येथील ठाणकेश्वर मंदिराजवळ असलेल्या समाज मंदिरासाठी निधी मिळण्यासंदर्भात भेंडखळ ग्रामपंचायतीने 22 ऑक्टोबर 2022 रोजी ठराव करून रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे दिला होता.
बाळासाहेबांची शिवसेनेचे रायगड उपजिल्हाप्रमुख तसेच भेंडखळ गावचे माजी सरपंच अतुल भगत यांनी यासाठी पाठपुरावा करून पालकमंत्र्याकडुन या कामासाठी निधी मंजुर करून घेतला आहे.लवकरच हा निधी भेंडखळ ग्रामपंचायतीकडे सुपुर्द होईल, ह्याबाबत भेंडखळ गावच्या ग्रामस्थांनी तसेच ग्रामविकास आघाडीने अतुल भगत यांचे आभार मानले आहेत.
Check Also
परेश ठाकूर यांची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड
पनवेलसह रायगडच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची (एमबीए) ८४वी चतुर्वार्षिक …
RamPrahar – The Panvel Daily Paper